सातारा सायबर पोलिस, जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख तसेच शहर पोलिसांना लोकवृत्त कडून मानाचा त्रिवार सल्यूट*

615

*सातारा सायबर पोलिस, जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख तसेच शहर पोलिसांना लोकवृत्त कडून मानाचा त्रिवार सल्यूट*

गेल्या २३ वर्षांपासून लोकवृत्त न्यूज अतिशय निर्भिड व निःपक्ष रुपी काम करत आहे. मात्र एप्रिल महिन्यात लोकवृत्त न्यूज वर एक कठीण प्रसंग आला. सुमारे १.५० लाख followers असलेले फेसबुक पेज हॅक करण्यात आले आणि आमचे संपादक सुजित आंबेकर यांच्या बदनामीचे षडयंत्र सुरू झाले. रोज अश्लील व्हिडिओ व फोटो यांचा भडिमार सुरू होता. अत्यंत कठीण परिस्थितीत लोकवृत्त सुरू ठेवण्याच काम आम्ही केलं , आम्ही lokvruta news नावाचे नवीन पेज सुरू केले त्याला ही दर्शकांनी उद्दंड प्रतिसाद दिला. मात्र आमचं जुनं पेज वरील अश्लीलता थांबायचे नाव घेत न्हवती. आम्ही अनेक प्रयत्न केले मात्र त्याला अजिबात यश आले नाही.

 

*सातारा पोलिसांना ग्रँड सल्युट*

 

गेल्या महिन्यात आमचे संपादक सुजित आंबेकर आणि सातारा पोलिस अधीक्षक यांची भेट झाली आणि तात्काळ आमच्या संपादकांनी IT ACT खाली FIR दाखल केली. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी लोकवृत्त बाबत सर्व गोष्टी बारकाईने समजून घेतल्या आणि अतिशय आत्मविश्वासाने तुम्हाला तुमचे पेज पुन्हा परत मिळून देतो अशी खात्री दिली. सुमारे २ तास स्वतः पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी वेळ देवून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.

 

*आता बोलूया सातारा सायबर व शहर पोलिस यांच्या बाबत*

FIR दाखल होताच सातारा सायबर पोलिस व त्यांच्या टीम ने लोकवृत्त चॅनल साठी अहोरात्र कष्ट घेतला याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल सातारा सायबर टीम मध्ये एक जबरदस्त हिरा आहे सायबर सेक्युरिटी आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट जय गायकवाड जो अशक्य ते शक्य करू शकतो. सातारा सायबर टीम मधील या हिऱ्या ने अत्यंत अवघड अशी आमची केस सोल्व केली आहे. त्यांना सहकार्य पोलिस निरीक्षक संदिप जगताप, पोलिस निरीक्षक हेमंत कुमार शहा, पोलिस उप निरीक्षक महेश शेटे, महिला पोलिस हवालदार माधुरी बाचल, वर्षा खोचे, श्रद्धा माने, गौरी कुटे, सिमा भुजबळ, सुप्रिया रोमन, अमित झेंडे, अजय जाधव, विद्या यादव, महेश पवार, अभिजित नवथरे, यशवंतराव घाडगे, प्रशांत मोरे, नितिरज थोरात, अतुला तावरे, रेश्मा तांबोळी, ओमकार दुबल.सातारा सायबर टीम ला हॅकर तसेच त्याच्या बरोबर इतर सहकारी ह्यांची पण माहिती मिळाली आहे . लवकरच सातारा पोलिस ह्या हॅकर व त्याला रसद पुरवणाऱ्यावर कडक कारवाई करतीलच अशी खात्री आम्हाला आहे.

 

 

लोकवृत्त न्यूज ची लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न काही समाज कंटकानी केला त्यांना त्यात ६ महिने आनंद मिळाला असेलही मात्र ह्या ६ महिन्यात सुमारे १लाख १७ हजार लोकांनी तोच विश्वास लोकवृत्त वर कायम ठेवला आणि त्याला मदत मिळाली ती पोलिस अधीक्षक समीर शेख सातारा सायबर व शहर पोलीस तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे सायबर सेक्युरिटी आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट जय गायकवाड यांची आणि आपलं सर्वांचं आवडतं लोकवृत्त पुन्हा त्याच जोमाने आपल्या सेवेत दाखल झाले आहे.

 

*लोकवृत्त टीम*

9011051115