आज मी आपणाशी एक सामान्य शिवभक्त व पोवई नाक्यावरील पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या आंबेकर कुटुंबातील एक घटक म्हणून बोलत आहे. गेले कित्येक वर्षे पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज हे उपेक्षित आहेत त्याच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण चे घोंगडे राजकारणापोटी भिजत पडले आहे. त्यांच्याच राजधानीत आणि वंशज राहत असलेल्या त्यांच्याच शहरात ही अवस्था ही बाब माझ्यासाठी व तमाम शिवप्रेमीसाठी क्लेशदायक आहे.
साताऱ्यातील दोन्ही राजे हे ह्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरण करण्यासाठी आलेल्या निधी साठी भांडताना दिसत आहे. यांच्यातील श्रेवादात आमचे छत्रपती शिवाजी महाराज भरडले जात आहेत आणि त्यात भर म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा समोर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे आयलँड रुपी चौक करण्याचा केलेली भिष्म प्रतिज्ञा.
एक मात्र मला राहून राहून इतकं वाईट वाटते की ना त्यांच्या वंशजांना अथवा पालकमंत्री शंभूराज देसाई यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण करण्याची इच्छा आहे.
पालकमंत्री ज्या पक्षात आहेत तो पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वस्व मानतो आज त्याच राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अव्हलेना त्यांना का दिसत नाही?
लोकनेत्यांचे स्मारक करण्याचा अट्टाहास तुमचा का आहे हे मला माहिती आहे आणि तो असावा पण. मात्र ज्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची निव ठेवली तो परिसर धूळ खात आहे त्याला नावारूपास आणले पाहिजे ही गोष्ट आपल्या कशी लक्षात येत नाही.
लोकनेते बाळासाहेब देसाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसर या वरून चालेल्या वादात एक सामान्य शिवभक्त आणि पोवई नाक्यावरील रहिवासी म्हणून मला अत्यंत वेदना होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसर चे आपण पावित्र्य ही राखावे आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा ही आदर करून सन्माननीय तोडगा काढावा कारण आपण सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे निस्सीम भक्त आहोत
तूर्तास एवढेच.
सुजित आंबेकर
संपादक लोकवृत्त