(अजित जगताप)
पत्रकारिता म्हणजे सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या समस्या मांडणे व त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जाब विचारणे .अशा अर्थाने घेतला जात होता .परंतु अलीकडच्या काळात आम्ही जे सांगू तेच तुम्ही छापले पाहिजे अन्यथा तुमचं काही खरं नाही अशा पद्धतीने पत्रकारिता वळण घेत आहे . त्यामुळे अनेक अपघात होत आहेत .पण, आता साताऱ्यातील निर्भीड व धाडसी पत्रकार यांच्यामुळे आता तमाम महाराष्ट्रातील पत्रकार मित्रांना खूप नवीन आयाम आल्याचे दिसून आलेले आहे.
पत्रकारिता ही पुणे मुंबई शहरापूर्ती मर्यादित होती .त्या ठिकाणी घडणाऱ्या घटनेचे संपूर्ण देशभर चित्रीकरण व प्रिंट मीडियामध्ये केला जात होते .चर्चा घडवली जात होती. पण, आता पेन्शनचे गाव असलेल्या साताऱ्यातील पत्रकारांबद्दल जगभरातूनच कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही प्रक्रिया एका रात्रीत घडली नाही. तर त्या पाठीमागे जिद्द व धाडसी भूमिका व काही प्रमाणात स्वार्थ सुद्धा आहे .हे तटस्थ मनाने पाहिले तर दिसून येत आहे.
वास्तविक पाहता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि त्यामुळेच काय वेळेला कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावर नेत्यांची प्रतिमा फुलत असते .तर दुसऱ्या बाजूला जर सत्य मांडायचं असेल तर कार्यकर्त्यांच्या उचापतीमुळे नेत्यांना सुद्धा त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. यापूर्वी अनेक नेत्यांनी त्याची किंमत मोजलेली आहे. आणि पुढेही काहींना आपल्या सामाजिक- राजकीय- शैक्षणिक -आर्थिक किंमत ही मोजावीच लागेल .याला कोणीही अपवाद नाही. मग तो पत्रकार असला तरी त्याचा सुवर्णकाळ हा फार काळ टिकत नाही. याची अनेक उदाहरणे आहेत.
एकेकाळी ज्या पत्रकारांची राजकीय नेते मंडळी वाट पाहत होते. त्याच पत्रकारांना शासकीय विश्राम गृहातील कक्षेमध्ये निरोप देऊन सुद्धा कोणी भेटले नाही. ही पण शोकांतिका आहे. पत्रकारितेचा निर्भीड व धाडसाने ज्यांनी पत्रकारिता केलेले आहे. त्यामध्ये अनेक लोकांची नावे घेता येतील. सातारचा जर विचार केला तर निर्भीड निपक्षपाती पत्रकार म्हणून. ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक बाळासाहेब आंबेकर ,नंदकुमार ढवळीकर, विजय मांडके, दिनकर झिंब्रे, ,बाबुराव शिंदे, सुरेश साधले,प्रफुल्ल फडके,प्रशांत पवार, श्रीकांत कात्रे, मुकुंद फडके, दिलीप रुद्र्भटे, शिवाजी राऊत, च. ने. शहा,घनश्याम छाबडा, अनिल देसाई, संग्राम निकाळजे, देविदास शेट्टी, बापूसाहेब जाधव , शरद काटकर,आनंद परांजपे ,अतुल देशपांडे ,नरेंद्र जाधव, बापू आफळे , दत्तात्रय सुपेकर, अजय कदम, मनोज पवार, प्रा.तुकाराम ओंबळे, माधव जाधव,विकास धुळेकर,एम. रमजु, महेंद्र जाधव,उल्हास भिडे, गजानन चेणगे, शिवाजी काळभोर, दिपक प्रभावळकर, दिपक शिंदे, चंद्रकांत देवरुखकर, उमेश भामरे,संजय कारंडे, प्रमोद इंगळे, प्रगती जाधव- पाटील, अमर मोकाशी,ओमकार तपासे, संजय साळुंखे , पांडुरंग बर्गे, आबा जाधव,राजेश सोळस्कर, संजय कदम,शैलेंद्र पाटील, केशव चव्हाण, रघुनाथ कुंभार, दिलीप चिंचकर, बापू बनकर,नरेश देसाई,अरुण जावळे, सुनिल क्षीरसागर, विलास माने, राजेंद्र त्रिगुणे ,ज्ञानेश्वर काळे, मधुसूदन पत्की, तुषार भद्रे, हुमायून सय्यद, बाळकृष्ण कदम , संतोष कदम,श्रीनिवास डोंगरे, संजय मोघे, दत्ता भोसले, एकनाथ थोरात, विजय कदम, अनिल वीर, निखिल करंदीकर,राजेन्द् गलांडे , विजय पगारे, दिपक बिडकर, धनराज जगताप अशी भरपूर नावे आहेत . काहींचे नावे समाविष्ट करणे गरजेचे आहे.
राज्यपातळीवर ज्ञानेश महाराव, मधू कांबळे,निखिल वागळे, मधुकर भावे, प्रताप आसबे ,नागेश केसरी, रफिक मुल्ला, रणधीर कांबळे, चंद्रकांत पाटील अशी बरीच मोठी नावे आहेत काही नावे ही पत्रकारांच्या पुढे जाऊन सामाजिक कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करणारे बरेच पत्रकार आहेत. त्यांचा नाम उल्लेख करणे शक्य आहे परंतु अनावधनाने कुणाचे नाव राहिले तर ते खापर आपल्या माती फुटू नये. म्हणून कुणाचाही नाम उल्लेख करू शकत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. साताऱ्यातील पत्रकारितेमध्ये तरुण पिढीने जी जिद्द व महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी केलेला प्रवास हा थक्क करणार आहे. कारण, त्याच्यासाठी परिश्रम घेणे. अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा या पत्रकारांमध्ये दैनिक जिव्हाळा तसेच दूरदर्शन, ई टीव्ही, सहारा समय मध्ये मंत्रालय प्रतिनिधी, टाइम्स नाव, इंडिया टीव्ही ,न्यूज नेशन, इंडिया न्यूज, अल जीजरा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिनी तसेच स्थानिक लोकवृत्त वाहिनी अशा सर्व विचारपीठांवर सॉरी व्यासपीठावर ज्यांनी आपली पत्रकारिता साकारली. त्यांची खरं म्हणजे वैचारिक भूमिका ही जरी वेगळी असली तरी त्यांना वैचारिक वारसा हा डाव्या विचारांची जुळणार आहे .
कॉम्रेड वसंत आंबेकर यांचे नातू म्हणजेच सुजित आंबेकर हे सध्या महाराष्ट्रभर आपल्या निर्भीड पत्रकारके मधील प्रश्नांमुळे सध्या चांगलेच गाजत आहेत. केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्यासमोरच श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या व्यक्तिगत कामकाजाबाबत टिपणी करून त्यांनी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टीचे चित्रीकरण व बातम्या प्रसारित झाल्या होत्या. परंतु ,शासकीय पातळीवर या गोष्टीचे नवल वाटू लागले आहे . कारवाई अपेक्षित असताना पत्रकार आंबेकर सारख्या निर्भीड पत्रकारालाच स्टेनगनदारी पोलीस बंदोबस्त देऊन पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे.पोलीस यंत्रणाला सुद्धा गळ्यात अडकलेले हडुक कसे काढावे. गिळता ही येत नाही आणि थुंकता ही येत नाही. अशी त्यांची अवस्था झाली आहे. हे सुद्धा सातारकरांनी पाहिले आहे.
पत्रकारिता करत असताना ज्यांचा आदर्श घ्यावा .अशी बरीच मंडळी असली तरी सातारचा विचार केला तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, एन. डी. पाटील तसेच सातारचे नाव सात समुद्रा पलीकडे घेऊन जाणारे कविवर्य बा. सी. मर्ढेकर, शाहीर पुंडलिक फरांदे, साहित्यिक डॉ आ. ह. साळुंखे, प्रा पार्थ पोळके, चित्रकार सागर गायकवाड ,तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, लोकनेते बाळासाहेब देसाई, किसन वीर,गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार, अभिनेते सयाजी शिंदे, कुस्तीपटू खाशाबा जाधव, पद्मश्री लक्ष्मण माने, चित्रपट लेखक प्रताप गंगावणे, कर सल्लागार अरुण गोडबोले,माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, पोलीस आयुक्त डी. एन. जाधव , यमुनाबाई वाईकर,शहीद तुकाराम ओंबळे , पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांना कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे सातारच्या पत्रकारिता बद्दल मांडणी करत असताना एकेकाळी दैनिक ऐक्य मुखपत्र होते. याच ऐक्यामध्ये बालवाडी व अंकलिपीचे धडे घेऊन अनेक नामांकित पत्रकार घडले. त्यामुळे कॉ . वसंत आंबेकर व सुरेश पळणीटकर, बापूसाहेब जाधव, बाळासाहेब आंबेकर, संजय कोल्हटकर यांचे नाव घ्यावेच लागते. राज्य पातळीवर पुरस्कार मिळवणारे साताऱ्यातील पत्रकार सुभाष देशमुख, सचिन जवळकोटे,अरुण देशमुख, हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी,जितेंद्र जगताप, प्रवीण शिंगटे पांडुरंग पवार, मोहन मस्कर पाटील,सतिश मोरे,अरुण जावळे, डेनिल खुडे, तुषार तपासे, राहुल तपासे, अजित भिलारे, सुरेश बोतालजी, शैलेंद्र धुमाळ, देवराज कामठी, बबन धनावडे, गुरुदास अडागळे, गिरीश चव्हाण, ज्ञानेश्वर भोईटे, संदीप राक्षे, प्रा.अशोक चव्हाण, नितीन कुलकर्णी, अशोक ननावरे, आशिष तागडे, आनंदा पाटील, भाग्यश्री पंडित, विनीत जवळकर,यांची पत्रकारिता जवळून अनुभवता आली आहे. आज ही त्यांच्या पत्रकारिता म्हणजे एक सामान्य माणसाच्या न्यायासाठी झटणारे शब्द भंडार व चित्रीकरण दिसून येत आहे.
सध्या पत्रकारितेमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भरीव किंवा भराव टाकण्यात आलेला असून या भरावामुळे पत्रकारीतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. पूर्वी पत्रकारिता म्हणजे वस्तूस्थिती समजून घ्या आणि तुम्हाला हवा असेल तसा त्याचा विपर्यास करा. असे मानले जात होते. अलीकडच्या काळामध्ये एका अंध व्यक्तीला हत्ती समोर घेऊन गेल्यानंतर त्याने हत्तीच्या सर्व अवयवाला एक एक करून हात लावला. त्याने कानाला हात लावल्यानंतर त्याला हत्तीचा कान सुपा सारखा वाटला. पायाला हात लावला. पाय खंबा सारखा वाटला. अशा पद्धतीने सध्या पत्रकारितेमध्ये एखादी बातमी ही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर येत आहे. पण ,सर्व मिळून एक हत्ती तयार होतो. हे मात्र मानण्यास अद्यापही कोणी तयार नाही. ही शोकांतिका आहे. पूर्वी वृत्तपत्र विद्या पदवीधर किंवा माहिती कार्यालय यांच्यासाठी मर्यादित असलेले हे क्षेत्र आता सब भूमी गोपाल की या न्यायाप्रमाणे सर्वत्र संचार करीत आहे .त्यामुळेच तर अलीकडे पत्रकारांवर होणारे हल्ले व मारहाण ही चिंतेची बाब झालेली आहे.
अनेक राजकीय पक्षाशी संबंधित पत्रकार किंवा संघटना यांच्याबाबत पूर्वी प्रत्येकाने आपापली मर्यादा राखूनच वाटचाल केली होती. आता इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जग जवळ आलेले आहे. त्यामुळे इस्रायल मध्ये घडलेली घटना इचलकरंजी पर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त एक बटन दाबावे लागते. पण ,काही वेळेला बातमी प्रसारित करत असताना त्याची खातरजमा करणे हे पण महत्त्वाचे आहे .सातारा जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामधील पत्रकारिता जी आम्ही पाहिलेली आहे. ती अत्यंत निकोप, निपक्षपाती व सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी होती. आजही त्याचा काही अंश शिल्लक आहे .काळ बदलला. वेळ बदलली. आता प्रसारमाध्यमांच्या अंकाच्या खप कमी होऊ लागलेला आहे. कारण आता वेळेचे बंधन पाळत असताना कोण पुढे आहे? हेच पहाण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे अनेकांना हर्डल शर्यत पार करताना दमछाक होत आहे. चांगल्या गोष्टी हव्या असतील तर त्याला काही वेळ वाट पाहावी लागते त्या अर्थाने आता दैनिकाची विश्वासार्हता कायम राखली गेलेली आहे की जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या पत्रकारांनी पुढे आले पाहिजे कारण आता पत्रकारितेला नवीन आयाम देण्यासाठी तरुण पिढी सज्ज झालेली आहे हे आता अधोरेखित झालेले आहे पूर्वी जुन्या पत्रकारितेमध्ये साधनसामुग्री कमी होती पण बऱ्यापैकी वेतन असल्यामुळे नीतिमत्ता पाळली जात होती आताच्या घडीला जे छपाल त्याचे पैसे आणा अन्यथा कोरा पेपर काढा असे जेव्हा संपादक सांगतात तेव्हा वाचकांनीही ते समजून घेतले पाहिजे कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कमवायाला शिका. असा नारा दिला जात आहे .याला आता कोणीही अपवाद नाही हे सांगण्यास आता ज्योतिषाची गरज नाही.
—————पत्रकार अजित जगताप, सातारा,
मोबाईल नंबर 99 22 24 12 99
——————————————–
फोटो -पत्रकारितेबाबत प्रतिनिधिक स्वरूपात फोटो