“श्री मंगलमुर्ती हॉस्पिटल” आरोग्य सेवेची दशकपूर्ती

319

“ श्री मंगलमुर्ती हॉस्पिटल” आरोग्य सेवेची दशकपूर्ती

 

“ सातारकरांच्या आरोग्यसेवेतील मानदंड श्री मंगलमुर्ती हॉस्पिटल ”

 

श्री मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर प्रा. लि. सातारा या वर्षी गणेश चतुर्थीला दशकपूर्ती साजरी करीत आहे. सामान्यातील सामान्य रुग्णांना सेवा देण्यासाठी असामान्य धाडस दाखवून सुरु केलेल्या हॉस्पिटल मधून आज सर्व प्रकारचे रुग्ण जेव्हा ठणठणीत होऊन बाहेर पडतात तेव्हा घेतलेल्या कष्टाचे आणि केलेल्या संघर्षाचे चीज झाल्यासारखे वाटते.

 

 

“श्री मंगलमूर्ती ग्रुप” चेअरमन श्री. सयाजी चव्हाण यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र व आम्ही वैद्यकीय व्यावसायिक या सर्वांनी मिळून सातारकरांना एक परवडेल अशी व स्वतःची हक्काची वास्तू द्यायची ही संकल्पना घेऊन २००९ साली चालू केला. साल २००९ ते २०१३ या चार वर्षात मंगलमूर्ती हे नाव बांधकाम क्षेत्रात एक विश्वास देऊन गेले त्यातच २०१३ साली गणेश चतुर्थीच्या दिवशी मंगलमुर्ती हॉस्पिटल च्या माध्यमातून आंतररुग्ण वैद्यकीय व्यवसाय प्रारंभ केला. ” आमचे सर्वांचे एकच ध्येय होते, ते म्हणजे रुग्णाला परवडेल व झेपेल अशी चांगल्यातील चांगली सेवा अल्पदरात पुरविणे. मग चांगली आरोग्य सेवा म्हणजे काय तर उच्च दर्जाची औषध उपचार व संतुलित आहार त्यातून एक कल्पना सुचली की पहिल्या दिवसापासून रुग्णांना मोफत चहा व प्रकृतीनुसार जेवण देणे तेही पूर्णपणे मोफत जे आम्ही गेली दहा वर्षे देत आहोत असे करणारे श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल साताऱ्यातील एकमेव हॉस्पिटल आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. रुग्णांना सेवा देत असताना कोणताही रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये ही सेवा उपलब्ध नाही म्हणून जाणार नाही याची आम्ही कटाक्षाने काळजी घेतो आणि यापुढेही घेत राहु. सध्या आपल्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक व्हेंटिलेटर मॉनिटर, डीफिब, सिरींजपंप, सेन्ट्रल ऑक्सिजन, सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम अद्यावत ९ बेड आय.सी.यू आणि ५ बेड सेमी आय.सी.यू. विशेष प्रशिक्षित अनुभवी इंटेन्सिव्हीस्ट कडून २४ तास निरीक्षण व प्रशिक्षित स्टाफ कडून देखभाल केली जाते त्याचप्रमाणे स्पेशल, सेमी स्पेशल, डीलक्स रूम व हवेशीर व प्रशस्त असा स्त्री व पुरुष जनरल वार्ड असे ५० बेडचे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे.

 

फिलिप्स कंपनीची जागतिक दर्जाची फ्लॅट पॅनल कार्डियाक कॅथ लॅब असून यामध्ये अनेक हृदय रोगांच्या रुग्णांवर आमचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. भूषण पाटील अहोरात्र यशस्वी उपचार करत असतात. कॅथलॅब मध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, आय. व्ही. सि. फिल्टर, पेसमेकर या सर्व प्रोसिजर केल्या जात असून, २५०० कॅथलॅब प्रोसिजरचा टप्पा नुकताच पार पाडला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांसाठी मोफत अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध असून शेकडो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

 

लहान मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यासाठी सर्व संसाधनांनी सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. विकास पाटील व सर्जन डॉ. संदीप निकम हे सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक व जनरल,लॅप्रोस्कोपीक,एडोस्कॉपी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत आहेत. त्याचप्रमाणे मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया डॉ.मनीष तपासे यशस्वीरित्या करत आहेत. इतरही विभागातील शस्त्रक्रिया तज्ञांच्या मार्फत यशस्वीरित्या केल्या जातात.

 

मेडिसिन, स्त्रीरोग, बालरोग, आयुर्वेद, होमिओपॅथी या सर्व विभागांमध्ये निष्णात तज्ञांकडून रुग्णांवर उपचार केले जातात. २४ तास ओपीडी, मेडिकल, पॅथॉलॉजी लॅब,२D Echo, एक्स-रे सुविधा उपलब्ध असून प्रशिक्षित व सेवाभावी स्टाफ रुग्णसेवेसाठी तत्पर असतो. लायन्स क्लबच्या मदतीने अत्याधुनिक ४ बेडच्या करिष्मा डायलिसिस सेंटर मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत डायलिसिस केले जाते.

 

बऱ्याच कंपन्यांची कॅशलेस व रिअम्बर्समेंट सुविधा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असून. ३० कि.मी पर्यंत गरजू रुग्णांना मोफत ऍम्ब्युलन्स सुविधा देण्यात येत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णास नम्र व तत्पर सेवा देण्यासाठी मंगलमूर्ती टीम सदैव कार्यरत असते.

 

याच जोडीला विविध रोग निदान औषधोपचार शिबिरे घेतली जातात.यासाठी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अविनाश वरंडे व डॉ. राजेंद्र सकुंडे यांचे विशेष योगदान असून मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून डॉ. जयदीप चव्हाण अहोरात्र काम पाहत आहेत. त्या मध्ये रुग्णांना मोफत व माफक दरात उपचार दिले जातात. गेल्या दहा वर्षाचा आढावा घेत असताना लक्षात येते की वाढत्या स्पर्धेमध्ये हॉस्पिटलने आपले स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे.

 

छोट्या युनिट पासून सुरुवात करत मेडिकल लॅब, ऑपरेशन थिएटर, डायग्नोस्टिक विभाग सुसज्ज केला नंतर डायलेसिस, कॅथलॅब ची सुविधा सुरू केली असून भविष्यात आरोग्य क्षेत्रातील नवनवीन संशोधनातून निर्माण झालेल्या उच्च दर्जाच्या सेवा सातारमध्ये देण्याचा ग्रुपचा मानस आहे .

 

हॉस्पिटलच्या वाढत्या क्षमतेमुळे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना मिळाली असून, योजनेंतर्गत जास्तीत जास्त रुग्णांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णांना सातत्यपूर्ण दर्जेदार सेवा सुविधा मिळाव्यात आणि रुग्णालयातील सर्व प्रोटोकॉल सुधारण्यासाठी असलेले QCI चे NABH Accrediation या वर्षी आम्हाला मिळाल्याने मंगलमूर्तीच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. त्यासाठी रुग्णालयातील प्रत्येकजण खूप कष्ट घेत आहे. त्यामध्ये सातत्य राखून दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. मंगलमुर्ती हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवेसाठी लावलेल्या छोट्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे.गेल्या दहा वर्षाच्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी कळत नकळत मदत केली सहकार्य केले त्या सर्वांच्या ऋणात राहून असेच सहकार्य भविष्यात मिळावे हीच अपेक्षा.पुन्हा एकदा साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.श्री मंगलमुर्ती हॉस्पिटल यापुढेही तत्पर रुग्णसेवेसाठी कटिबद्ध राहील. – डॉ. नितीन लेंभे (संचालक मंगलमुर्ती हॉस्पिटल सातारा)