राधिका संकुलन येथील उदयनराजे यांच्या कार्यकर्त्याच्या हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांची चेगराचीगरी तर आणि कार्यकर्त्यांकडून महिलांना अरेरावी
सातारा येथे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्याने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन आज राधिका संकुल मध्ये केले होते याचा मोठा गाजावाजा सुद्धा करण्यात आला होता परंतु या कार्यक्रमाचे नियोजन नसल्याने महिलांना याचा त्रास सहन करावा लागला या कार्यक्रम नियोजन शून्य असल्याने अक्षरशः कार्यक्रमाला आलेल्या महिलांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले काहींची लहान मुले हरवली तर काहींना या चेंगराचेंगरीचा प्रसाद सुद्धा मिळाला या कार्यक्रमात पूर्ण गोंधळ उडाल्या नंतर पोलिसांना बोलवण्यात आलं या पोलिसांना सुद्धा या महिलांना अडवताना नाकी नऊ झालं काही वेळानंतर या महिला शांत झाल्या परंतु या ठिकाणावरून जाताना अनेक महिलांनी अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत जाताना पाहिला मिळालं